यावेळी पुणेकरांनी गाडीची काच खाली घ्यायला लावली आणि त्याला चांगलंच सुनावलं. शिवसेनेचे आमदार किशोर दराडे पुण्यातील बाजीराव रोडने जात असताना. त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरने सायरन वाजवत गाडी चालवली होती. एक सुज्ञ पुणेकरांनी गाडीचा सायरन का वाजत आहे म्हणून पाहिलं तर गाडीमध्ये आमदार किशोर दराडे बसलेले होते.
शेवटी जाताना पुणेकराने शिवी देऊन तेथून काढता पाय घेतला. आमदार दराडे हा सर्व प्रकार पाहत होते. त्याचबरोबर पुणेकराने आमदार दराडे यांना खडे बोल सुनावले. पोलिसांकडे पाहू नको असंही या पुणेकराने चालकाला सुनावलं. यावेळी आमदार दराडे हे पुणेकरांकडे पाहत राहिले. पुणेकराने ड्रायव्हरला शीट बेल्ट का लावला नाही असा जाब विचारला. आम्ही निवडून देतो तेव्हा ते आमदार होतात. आम्ही जनता आहे.
किशोर दराडे हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत. पण, त्यांची चूक होती त्यामुळे तेही त्याला काही बोलू शकले नसावे. त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. किशोर दराडे हे दुसऱ्यांदा नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडून आले आहेत. नुकतेच ते नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडून आले आहेत. किशोर दराडे यांना पुणेकराचा हा अवतार पाहून धक्काच बसलेला असणार.
0 टिप्पण्या